खबरदार परिक्षेला उशिरा आलात तर…!


गैर प्रकाराला आळा घालण्यासाठी बोर्डाचा अफलातून प्रयोग!

वृत्तसेवा :माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी च्या विधार्यांनी परिक्षेला दिलेल्या वेळेच्या आत परिक्षा केंद्रात हजर रहावे अन्यथा उशिराने येणाऱ्या परिक्षार्थीना प्रवेश दिला जाणार नसल्याचा फतवा नुकताच बोर्डाने काढला आहे. परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर बोर्डाने हे पाऊल उचलले आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता अशी पेपरची वेळ आहे. आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती. परंतु राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या संदर्भातील पत्र देखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.
उशीरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. या ची मंडळाने दखल घेऊन कारवाई केली. परंतु या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी बोर्डाने पत्रक जारी केले आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षेला वेळेत हजर राहणे आवश्यक आहे. गैरप्रकारांवर प्रतिबंध घालण्यासाठी बोर्डाने परिपत्रक पाऊल उचलले आहे. यापुढे परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देता येणार नसल्याचे मंडळाने सांगितले आहे.
यावर्षी असणार असे बदल!
गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र यावेळी परीक्षेत काही बदल करण्यात आले आहे. ज्यात गेल्यावर्षी परीक्षेसाठी देण्यात आलेली होम सेंटर पद्धत बंद करण्यात आली आहे. सोबतच दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे.
औरंगाबाद विभागता दहावीसाठी एकूण 1 लाख 80 हजार 210 विध्यार्थी परीक्षा देणार असून, ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील 64 हजार 593, बीड 41 हजार 521, परभणी 27 हजार 800, जालना 30 हजार 676 आणि हिंगोली जिल्ह्यातील 15 हजार 620 विद्यार्थ्यांनाचा समावेश आहे. तसेच बारावीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील 60 हजार 400, बीड 38 हजार 929, परभणी 24 हजार 366, जालना 31 हजार 127 आणि हिंगोली जिल्ह्यातील 13 हजार 441 विद्यार्थ्यांनाचा समावेश आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »