विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर च्या दृष्टीने बघावे: पूजाताई निकम.


सावर्डे येथे मुंबई विद्यापीठ कोकण विभागाच्या हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन.
सावर्डेचा कला व विज्ञान महाविद्यालयाचा संघ विजेता

सावर्डे:
मुंबई विद्यापीठ कोकण विभाग व सह्याद्री शिक्षण संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूण पंचायत समिती माजी सभापती सौ.पूजाताई निकम या उपस्थित होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधताना त्या म्हणाल्या की, आजचे युग हे खेळाचे युग आहे खेळामधून बरेच विद्यार्थी शासकीय व प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत अशाच प्रकारचे ध्येय समोर ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याने खेळाकडे करिअरच्या दृष्टीने बघावे.

Advertisement

या स्पर्धेमध्ये रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून जवळपास 17 संघ सहभागी झाले होते. यामध्ये सावर्डे च्या कला व विज्ञान महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने द्वितीय व एस पी हेगशेट्ये रत्नागिरी या महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला. यावेळी उद्घाटन प्रसंगी उद्योजक प्रशांतशेठ निकम,संचालक मारूतीराव घाग, प्राचार्य उमेश लकेश्री कोंकण विभागाचे सचिव चंद्रकांत नाईक,क्रीडा शिक्षक सुशील सावंत, विशाल सुर्वे,क्रीडा समन्वयक प्रा.संकेत कुरणे,प्राचार्य टी. वाय.कांबळे सर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »