जयगड येथे सह्याद्रि स्कूलच्या कलाकारांचा कलाविष्कार


संगमेश्वर : कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र-शिल्प कलामहाविद्यालय प्रतिवर्षी पावसाळी शैक्षणिक सहलीचे आयोजन करते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर निसर्गात जाऊन चित्रकलेचे प्रत्यक्ष धडे मिळावेत यासाठी अशा निसर्गरम्य ठिकाणी व ऐतिहासिक स्थळांवर नेले जाते. तेथे जाऊन विद्यार्थी प्रत्यक्ष निसर्गाशी समरस होऊन ते दृश्य कागदावर उमटवितात. तेथील झाडे, डोंगर, नदी, घरे, माणसे अशी विविधांगी रेखाटने विद्यार्थी आपल्या कलेतून उमटवितात.

जयगड येथे आयोजित पावसाळी सहलीतील चित्रांच्या प्रदर्शनाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या वर्षी पावसाळी शैक्षणिक सहल रत्नागिरी जिल्यातील जयगड या ठिकाणी नेण्यात आली होती . जयगडला लाभलेल्या समुद्र आणि खाडिमुळे जयगडच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे. तेथील जयगड बंदर,किल्ला, कऱ्हाटेश मंदिर,गणपती मंदिर हि सहलीची ठिकाणे होती.

Advertisement

पहिल्यादिवशी सकाळी धुक्यामध्ये जयगड किल्ला तसेच मंदिर आणि सागर खाडी त्यावर पडणारी सूर्याची किरणे त्यामुळे दिसणारे मनमोहक दृश्य विद्यार्थ्यांनी जलरंग, तैलरंग, पेन्सिल, खडू अशा विविध माध्यमात ८० हून अधिक चित्रे व शिल्पे तयार केली. या चित्र शिल्पांचे कलाप्रदर्शन जे एस डब्ल्यू कंपनीतर्फे ८ नोव्हेंबर २०२३ पासून जयगड (विनायकवाडी )येथे मांडण्यात आले आहे . या प्रदर्शनाच्या उदघाट्न प्रसंगी अनिल दधिच (सी. एस. आर -हेड जेएसडब्लू, फौंडेशन -रत्नागिरी ), हर्षवर्धन नावाथे -((सी.ओ. ओ.जेएसडब्लू, फौंडेशन), प्रविण गेवाडी, अविनाश मिश्रा, अमित भातखंडे , प्रफुल्ल पाटील तसेच सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट चे चेअरमन कोकणचे जेष्ठ चित्रकार -शिल्पकार प्रकाश राजेशिर्के , प्रदीपकुमार देडगे , विक्रांत बोथरे व कलाविद्यार्थी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »